Appreciation of a poem असा 10 गुणांचा प्रश्न विचारला जाणार आहे. हा प्रश्न विदयार्थ्याच्या परिचयाचा नाही. या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे दयायला हवे, याचे मार्गदर्शन पुढे दिले आहे.
कवितेचे रसग्रहण म्हणजे काय ? how to write a critical appreciation of a poem?
एखादया कवितेचे appreciation म्हणजे, त्या कवितेची रचना, विषय, आशय, कवितेत मांडलेले विचार, भावना, प्रसंग, शब्दयोजना, भाषाशैली, भाषिक अलंकार इत्यादी वैशिष्ट्ये ओळखून त्यांतील उत्तम गुणांचा आस्वाद / आनंद घेणे. कवितेतील आनंद देणाऱ्या विविध अंगांचे/ घटकांचे वर्णन, त्यांचा तुमच्यावर पडलेला प्रभाव, त्या कवितेतील कोणते गुणविशेष तुम्हांला भावले, इत्यादींविषयी तुमचे विचार, भावना, कविता समजून घेऊन व्यक्त करणे महत्त्वाचे असते.यालाच write a critical appreciation of the poem असेही म्हणतात.
Appreciation of a poem पुढील मुद्द्यांनुसार प्रश्नातील कवितेचा रसास्वाद/रसग्रहण करणे अपेक्षित आहे :
(1) Title : सर्वप्रथम कवितेचे शीर्षक लिहावे.
( 2 ) Author / Poet: त्यानंतर कवी/कवयित्रीचे नाव लिहावे.
काही कवितांखाली असे नाव नसते, तेथे ‘anonymous’ असे दिलेले असते. याचा अर्थ एखादया ‘अज्ञात’ व्यक्तीने ती कविता लिहिलेली असते.
कवितेतील
(3) Rhyme Scheme : Rhymes (यमके) प्रत्येक ओळीच्या अखेरीस येत असतात. त्यांचे ध्वनी (उच्चार) सारखे असतात. उदा., blow-snow, love-above etc. या Rhyming words ची रचना कडव्यात विशिष्ट नियमित साच्यात / नमुन्यात येत असते. कडव्यातील नियमित यमक योजनेला ‘Rhyme Scheme’ असे म्हणतात. Rhyme Scheme ‘aa, bb, c’ इत्यादी अक्षरांचा उपयोग करून लिहावी लागते.
तुम्हांला
(4) Favourite line/lines : (कवितेतील आवडलेली ओळ/ओळी.)
दिलेल्या कवितेतील तुम्हांला आवडलेल्या पंक्ती / ओळी या भागात लिहायच्या आहेत.
(5) Theme / Central idea : (कवितेचा विषय / मध्यवर्ती कल्पना)
दिलेल्या कवितेचा मुख्य गाभा/विषय, त्या कवितेतील मुख्य कल्पना, मुख्य विचार किंवा घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना 2-3 ओळींत ‘मध्यवर्ती कल्पना’ लिहायची असते. कवीला कोणता महत्त्वाचा/ मुख्य विषय अभिप्रेत आहे, हे मध्यवर्ती कल्पनेतून समजते. poems about life.
(6) Figure of Speech (भाषिक अलंकार) : कवितेचे भाषासौंदर्य वाढवण्याकरिता कवी आपले विचार, कल्पना
इत्यादी प्रभावीपणे मांडण्याकरिता सर्वसामान्य भाषा वापरण्याऐवजी वेगळ्या अशा आलंकारिक भाषेचा उपयोग करतात. नववीच्या कवितांत प्रामुख्याने Simile (उपमा), metaphor (रूपक), inversion (व्युत्क्रम), Personification (चेतनगुणोक्ती), antithesis (विरोधाभास) या Figures of Speech चा उपयोग केलेला आहे.
(7) Special Features (कवितेची खास वैशिष्ट्ये) : critical appreciation या विभागात (1) Type of the poem (2) Imagery व
(3) Implied meaning या कवितेच्या तीन खास वैशिष्ट्यांविषयीची माहिती अपेक्षित असते.
(a) Type of the poem (कवितेचा प्रकार) :
एखादी कविता, एखादया प्रसंगावर, विषयावर (Subject matter)
किंवा कवितेच्या विशिष्ट रूपावर (form वर) आधारित असते.कवीला भावणाऱ्या कोणत्याही एखादया विषयावर, स्थितीवर,प्रसंगावर आणि कोणत्याही काव्यप्रकारात उदा., Soliloquy/Monologue (स्वगत) कविता लिहिली जाते. Soliloquy किंवा Monologue मध्ये कवी आपले मनोगत स्वतःशी व्यक्त करीत असतो किंवा आपले विचार स्वगताच्या स्वरूपात दुसऱ्यांना ऐकवत असतो.
(b) Imagery (कवीने भाषासौंदर्याने रेखाटलेले कल्पनाचित्र) :कवी आपल्या प्रतिभेने कवितेशी संबंधित वस्तू, कृती, दृश्ये, स्थिती इत्यादींची चित्रे सौंदर्यपूर्ण शब्द, भाषिक अलंकार इत्यादींच्या साहाय्याने निर्माण करतो. कवीची ही प्रतिमासृष्टी / कल्पनाविश्व वाचकांना आनंद देते. पाठ्यपुस्तकातील ‘Silver’ ही कविता ‘Imagery’ चे एक उत्तम उदाहरण आहे.
(c) Implied meaning (गर्भितार्थ / सूचित अर्थ)
(At least 5 to 6 lines)
कवी कवितेतील विचार/कल्पना सरळ, साध्या शब्दांत न मांडता ते गर्भित अर्थाने / सूचित शब्दांत/ओळीत कवितेचे सौंदर्य खुलवत असतो. या गर्भितार्थाचा खुलासा/स्पष्टीकरण करून 5-6 ओळींत खरा
अर्थ सांगण्याचा प्रयत्न करावा.
(8) Why I like / don’t like the poem (ती कविता
मला का आवडली/का आवडली नाही?) :दिलेली कविता तुम्हांला कोणत्या कारणांमुळे आवडलीकोणत्या कारणांमुळे आवडली नाही, हे थोडक्यात लिहा.
appreciation of poem all the world’s a stage